राजकारणातील चार दिग्गजांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार !

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. मात्र, याच उलथापालथी मध्ये भारतीय राजकारणातील काही नामवंत आणि दिग्गज चेहरे यावर्षी निवडणुकीमध्ये दिसून येणार नाहीत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीला नकार दिला आहे. तर दुसरीकडे रामविलास पासवान, सुषमा स्वराज, उमा भारती यांसारखे दिग्गज नेते या निवडणुकांसापासून लांब राहिलेले दिसून येते आहेत. तसेच लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे अजून तरी गुलदस्त्यात आहेत.

शरद पवार  

१४ लोकसभा निवडणूका लढणारे शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेस पक्षातून वेगळं होऊन आपला स्वतंत्र पक्ष काढला. १९६७ साली शरद पवार पहिली निवडणूक लढले आणि विजयी झाले. ते तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये राहून कृषी विभागासारखे अनेक महत्वाचे पदे सांभाळले. यावर्षीची लोकसभा निवडणूक ही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लढणार आहे. युवकांना संधी मिळावी म्हणून शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.

सुषमा स्वराज  

दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वात कमी वयात (२५ वर्ष) हरियाणा मध्ये मंत्री पद मिळविले. १९७७ साली पहिल्यांदा हरियाणा विधानसभा साठी सुषमा स्वराज यांची निवड झाली होती. तसेच सुषमा स्वराज हरियाणा,दिल्ली, उत्तर-प्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या सारख्या राज्यांमध्ये राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणांमुळे तसेच, धूळ आणि इन्फेक्शन या कारणांमुळे सुषमा स्वराज यांना निवडणुकी पासून लांब राहण्याचा सल्ला डॉक्तरांनी दिला आहे.

रामविलास पासवान

५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणारे रामविलास पासवान हे आपल्या कारकिर्दी मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढणार नाहीत. रामविलास पासवान १९६९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. १९७७ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून थेट राज्यसभेत प्रवेश मिळवला. तसेच, आठ वेळा लोकसभा तर, एकदा राज्यसभेवर त्यांची निवड झाली होती. रामविलास पासवान यांनी जानेवारी मध्येच सांगितले होते की, यावर्षीची लोकसभा निवडून मी लढणार नाही. तसेच त्यांनी या गोष्टी मागचे कारण अद्याप तरी सांगितले नाही.

 उमा भारती 

अयोध्या प्रकणात मुख्य भूमिका बजावणारे उमा भारती यांनी १९८९ मध्ये पहिल्यांदा खजुराहो मधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये उमा भारती झांसी मधून लोकसभा सदस्य झाल्या. त्या उत्तर प्रदेशच्या मुखमंत्री देखील होऊन गेल्या.  त्यांच्यावर पोलीस कारवाई झाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षातून सुद्धा त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, जून २०११ मध्ये उमा भारती यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला. दरम्यान, उमा भारती यांनी फक्त प्रभू श्रीराम आणि गंगा यासाठी काम करणार असून, मी फक्त पक्षाचा प्रचार करत राहणार असल्याचे सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)