नाशिकमध्ये सिलेंडरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र.......

नाशिक – सिलेंडरचा स्फोट होऊन कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्‍यात घडली आहे. दिंडोरीच्या धाऊर या गावी शेताच्या वस्तीवर मुरलीधर चौधरी हे आपल्या बायको आणि मुलासह राहतात. त्यांच्या भावाचा मुलगाही त्यांच्याकडे मुक्कामी आला होता.

मुरलीधर हरी चौधरी (32), कविता मुरलीधर चौधरी (30), मुलगा तुषार चौधरी (10) आणि पुतण्या नयन चौधरी (8) अशी मृत्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चौधरी कुटुंब झोपलेले असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण घर जळून खाक झाले. विशेष म्हणजे सिलेंडरचेही दोन तुकडे होऊन ते घराबाहेर फेकले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौधरी यांच्या घरात दिवा लावलेला होता. त्या दिव्याची ठिणगी पडली आणि गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून सर्व संसार उपयोगी साहित्यासह मोटरसायकल देखील भस्मसात झाली. घराला लागलेली आग एवढी भयंकर होती की परिसरातील कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत करता आली नाही.

दरम्यान, बुधवारी (दि.20) सकाळी कळवण पोलीस उपविभागाचे विभागीय अधिकारी देविदास वाघमारे, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यासह दिंडोरीचे प्रांताधिकारी उदयकुमार किसवे, दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे व दिंडोरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)