पबजी खेळामुळे चार मुले घर सोडून पळाली

एकाच कुटूंबातील दोन भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश

भोपाळ – पबजी या खेळातील मिशन पुर्ण करण्यासाठी एका घरातील दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील एक मुलगी 15 आणि दुसरी मुलगी अवघ्या 13 वर्षांची आहे. तर त्यांचा एक भाऊ 11 वर्षांचा आणि दुसरा 9 वर्षांचा आहे. दरम्यान पोलिसांनी तपास करुन त्यांना ग्वाल्हेर रेल्वेस्थानकात ताब्यात घेतले आहे.

पबजी खेळताना एकच लाइफलाइन उरल्यावर खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी 500 किलोमीटर अंतर पार करण्याचे टार्गेट त्यांना दिले गेले होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी ही मुले रविवारी रात्री घरातील सर्व जण झोपले असताना गुणा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेली. तेथून त्यांनी ट्रेन पकडली. मुले घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सर्वत्र शोधले. तर, घरातील 1 लाख रुपयेही गायब असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

यावेळी पोलिसांनी रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ते रेल्वेने निघून गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यावरुन तपास केला असता गुणा गावापासून अंदाजे 250 किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी संध्याकाळी या मुलांना घरी आणून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. पबजी मिशन पूर्ण करण्यासाठी नाही, तर ग्वाल्हेर येथे मॉल बघण्यासाठी गेलो होतो, असे या मुलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)