गुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन

नवी दिल्ली : गुजरात मध्ये नरोडा पटिया येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या चार आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. उमेशभाई सुराभाई भारवाड, राजकुमार , पद्‌मेंद्रसिंह रजपुत, आणि हर्षद उर्फ मुंगडा परमार अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 20 एप्रिलला 29 पैकी 12 आरोपींची शिक्षा कायम केली होती तर माजी मंत्री माया कोदनानी यांच्यासह अन्य 17 जणांची निर्दोष सुटका केली होती. 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद येथील नरोडा पटिया भागात झालेल्या दंगलीत 97 जणांची हत्या करण्यात आली होती यातील बहुतेक सर्व जण अल्पसंख्याक समाजाचे होते. गोध्रा येथे कारसेवकांना जाळण्याची घटना घडल्यानंतर या दंगली उसळल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)