तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘एम करुणानिधी’ अनंतात विलीन 

करुणानिधी यांचे पार्थिव शरीर तिरंग्यात गुंडाळले असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांची प्राणज्योत काल मावळली. प्रदीर्घ आजारपणामुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज करुणानिधी यांच्यावर शासकीय इतमामात मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

९४ वर्षीय करुणानिधींनी सुरुवातीला एम जी रामचंद्रन तर नंतर जयललिता या मातब्बर राजकारण्यांशी दोन हात करत तब्ब्ल ६ दशक तामिळनाडूच्या राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला.

एम करुणानिधी तमिळनाडू राजकारणातील खूप मोठे नाव होते, ते पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)