माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

कोलकाता: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय ८९) यांचे निधन झाले आहे. यांची प्रकृती पुन्हा खालावली होती त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून चॅटर्जी हे मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना 10 ऑगस्ट रोजी उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यंदाच्या जून महिन्यांत सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
14 व्या लोकसभेत ते पश्‍चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र आहेत. चॅटर्जी यांनी नुकतीच पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर टीका केली होती.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे.  दहा वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले चॅटर्जी यांनी 1968 मध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 1971 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)