मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक 

माले (मालदीव) – मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात त्यांना माले येथील एका न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. साक्षीदारांना लाच देण्याचा ते प्रयत्न करत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात फिर्यादी पक्षाने गयूम यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाऴात गयूम यांनी सात कोठी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची अफरातफर केल्याच त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे.
गयूम यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्यामुळे सध्याच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना शुक्रवारी आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष गयूम यांना सत्ता गमवावी लागली होती. गयूम यांचा पराभव करून इब्राहिम मुहम्मद सोलिह मालदीवचे अध्यक्ष बनले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)