माजी खासदार अरविंद शर्मा भाजप मध्ये केला प्रवेश

नवी दिल्ली: हरियानातील कॉंग्रेसचे माजी खासदार अरविंद शर्मा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून कर्नाल मतदार संघात उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. शर्मा हे कॉंग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा निवडून आले आहेत त्यांनी आज हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्ष मजबुत होईल असा विश्‍वास मुख्यमंत्री खट्टर यांनी व्यक्त केला.

मोदींच्या नेतृत्वाखालीच देशातील गरीबांचा विकास होऊ शकतो याचा विश्‍वास असल्याने आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शर्मा यांनी दिली. त्यांच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल जैन हेही उपस्थित होते. अरविंद शर्मा हे 1996, 2014, 2009 या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते पण सन 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)