गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेस सोडणार नाहीत : काँग्रेस

पणजी : गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने काल गोव्याच्या राज्यपालांकडे राज्यातील सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असणाऱ्या काँग्रेस पक्षास सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रामध्ये राज्यातील भाजप सरकार भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या मृत्यूनंतर अल्पमतात गेले असल्याचा दावा करण्यात आला होता.

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचालींना वेग आल्याचे पाहून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पणजी येथील कार्यालयामध्ये पक्षाच्या आमदारांची तातडीने बैठक बोलविण्यात आली होती. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त देखील गोव्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिले जात होते.

-Ads-

दिगंबर कामत काँग्रेसला राम राम ठोकणार या वृत्ताबाबत आता काँग्रेसतर्फे भूमिका मांडण्यात आली असून पक्षाचे जेष्ठ नेते दिगंबर कामत हे अशाप्रकारचे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचा विश्वास काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेस नेते चंद्रकांत कवलेकर यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली असून ते म्हणतात, “दिगंबर कामत हे काँग्रेसचे जेष्ठ नेते असून ते अशाप्रकारचे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याची आम्हाला खात्री आहे. दिगंबर कामत यांच्याबाबत पसरविण्यात आलेली ही अफवा भाजपचे षडयंत्र आहे.”

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)