मला वाटते ऑस्ट्रेलिया जिंकेल; पण कारण विचारू नका – चॅपेल

सिडनी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी होईल अशी आशा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांना आहे. परंतु, विजयाचे दावेदार म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला का प्राधान्य देत आहेत याचे नेमके कारण त्यांना माहिती नाही. भारतीय संघात मालिका विजयासाठी काहीतरी कमी आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हीड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ सारखे धुरंदर खेळाडू नसले तरी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांना वाटते की, या कसोटीमालिकेत ऑस्ट्रेलिया संघच विजयी ठरेल. या विषयी बोलताना ते म्हणले, मी ऑस्ट्रेलिया संघाला पंसती देतो परंतु कारण मला विचारू नका. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये ज्याप्रकारे प्रदर्शन केले त्यावर मी समाधानी नाही. तेथे भारतीय संघाने मालिका विजय संपादन करायला हवा होता, असेही चॅपल यांनी सांगेतले.

-Ads-

पुढे बोलताना ते म्हणाले, खेळातील प्रतिभा आणि कौशल्याचा विचार केला तर भारतीय संघ सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या कितीतरी पुढे आहे. पण त्यांच्यामध्ये वैशिष्ठ गोष्टीची कमी आहे. त्याचबरोबर अन्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाचे जलदगती गोलंदाज. ऑस्ट्रेलियाचे जलदगती मारा हा येथील वातावरणाला पूरक असून त्यांनी स्वता सिद्ध करून दाखवले आहे. तर भारतीय जलदगती गोलंदाजांना येथील परिस्थितीमध्ये स्वतःला अजून सिद्ध करायचे आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले होते. मात्र येथील परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे.

विराट विषयी बोलताना ते म्हणले की, मागील वेळी जेव्हा विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्यावेळी त्याने खूप धावा जमविल्या होत्या. मला अशा आहे की तो यावेळी देखील चांगल्या धावा करेल. परंतु, ही मालिका विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अशीच रंगेन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)