मोदी सरकार सत्तेवर आल्यास निवडणुका विसरा : कुमार सप्तर्षी  

कराड – राष्ट्रवाद टिकविण्यासाठी सर्व धर्मात जे चांगले आहे ते घेतले पाहिजे. केवळ हिंदुत्वच मान्य करायचे म्हटले तर देशाचे तुकडे पडणार, हे लक्षात ठेवा. आताच्या सरकारला हिंदूराष्ट्र नव्हे तर एकाधिकारशाही निर्माण करायची आहे. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर यापुढे निवडणुका होणार नाहीत, अशी भीती युक्रांदचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्‍त केली.

उंडाळे येथे स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने स्वातंत्र्य संग्रामस सैनिक अधिवेशनात पुण्याच्या एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांना डॉ. सप्तर्षी यांच्या हस्ते स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्येकाच्या भावनात्मक खिडक्‍या वेगळ्या असल्याने मी राम राम, सलाम वालेकूम, जय कृष्ण, जय भीम असे संबोधले. यापुढे देशात आजसारखीच परिस्थिती निर्माण झाली, तर ओम नमो नमाय म्हणजे ओम नरेंद्र मोदी नमाय, असे म्हणावे लागेल. प्रा. धनाजी काटकर यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2 COMMENTS

  1. कुडमुड्या कुमार सप्तर्षी आता भविष्य पण सांगायला लागले का? सांजवादावर आपली अक्कल पाजला फार उंच उद्या घेऊ नका,

  2. आता छाती दुखते म्हणून कोर्टाच्या पाय पडून बाहेर आलेला गुन्हेगार नाही का लोकसभेत जायची स्वप्न बघत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)