वनविभागाची आढावा बैठक पुण्यात सुरू

पुणे – वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित हिंजवडी येथे सुरूवात झाली. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक यू. के. अगरवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील, सामाजिक वनिकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विकास खांडेकर उपस्थित होते.

या परिषदेत सहभागी झालेल्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंबधी चर्चा केली. 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रम, खासगी वनांचा विकास, बांबू वनांचा विकास, बांबू लागवड व संवर्धन, इको टूरीझम व अन्य विषयांवर यावेळी अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत साधक-बाधक चर्चा होते तसेच विचारमंथन होते, त्यामुळे वन विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात नवीन निर्णय घेणे शक्‍य होते असे सांगितले. वृक्ष लागवड उपक्रमाची दखल घेऊन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जारी केलेले प्रमाणपत्र यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)