विदेशी मातेचा ‘मुलगा’ देशभक्त असूच शकत नाही : भाजप नेत्याची टीका

भारतीय जनता पक्षाला तीन हिंदू बहुल राज्यांमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर पक्षातील काही नेत्यांचा संयम सुटत असल्याचे चित्र दिसत आहे. याचीच प्रचिती भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केलेल्या एका ट्विटच्या माध्यमातून आली. विजयवर्गीय यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना, “विदेशी मातेच्या उदरातून जन्म घेतलेला ‘पुत्र’ कधीच देशभक्त असू शकत नाही आणि त्याच्या हृदयामध्ये कधीच देशाविषयी प्रेम असणार नाही.” असे ट्विट केले आहे.

दरम्यान, सोनिया गांधी या जन्माने इटलीच्या असल्या तरी त्यांनी भारत हाच आपला खरा देश असल्याचे अनेकवेळा म्हंटले आहे. भाजपच्या नेत्याच्या या ट्विटवरून राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याने हे ट्विट हटविण्यात आले असले तरी विजयवर्गीय यांनी याबाबत अजूनही माफी मागितलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी विजयवर्गीय यांचे निवडणुकांमधील पराभवानंतर मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना इलाजाची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)