पुणेकरांच्या जिभेवर परदेशी फळांचा गोडवा

सफरचंद, द्राक्षे, पिअरची बाजारात चलती


रंग, दर्जा, चव आणि टिकाऊपणामुळे मागणी


इतर फळांच्या तुलनेत 25 ते 30 टक्के आवक

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – परदेश आणि तेथील वस्तुंबद्दल भारतीयांना नेहमीच आकर्षण असते. तेथील खाद्यपदार्थांबाबतही जाणून घेण्यातही उत्सुकता असते. आता आहारतही विदेशी पदार्थ दिसू लागले आहेत. तेथील फळांची चव नागरिकांना लागली आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात परदेशी फळे दाखल होत आहेत. रंग, दर्जा, चव आणि टिकाऊपणामुळे ही फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

30 टक्‍के फळे विदेशी
देशातील फळांचा हंगाम संपल्यानंतर परदेशातून फळांची आवक सुरू होते. त्यामुळे वर्षभर हंगाम नसला, तरी बहुतांश फळे फळबाजारात दिसून येतात. परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतगृहांची व्यवस्था असल्यामुळे ही फळे चांगल्या स्वरुपात आणि वेळेवर बाजारात दाखल होतात. इतर फळांच्या तुलनेत जवळपास 25 ते 30 टक्के विदेशी फळांची आवक होते.

सफरचंदाची सर्वाधिक आवक
सर्वाधिक आयात होणाऱ्या फळांमध्ये सफरचंदाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अमेरिकन सफरचंदाबद्दल तर अनेकांना आकर्षण आहे. हवाई, जलमार्गाद्वारे ही फळे भारतात येतात. हाताळण्यास नाजूक असलेली चेरी, ऍप्रिकोट, जर्दाळू, ब्लू बेरी, रासबेरी आदी फळे विमानाने पाठविली जातात. तर, इतर सर्व फळे जहाजातून मुंबई आणि चेन्नई पोर्ट येथे पाठविली जातात. तेथून ही सर्व फळे देशभरात पाठविली जातात.

…म्हणून फळांना मागणी अधिक
परदेशी फळांच्या मागणीत गेल्या 7-8 वर्षांत लक्षणीय वाढ झाली. आहार जागरूकतेमुळे वजन कमी करणे असो किंवा वाढविणे फलाहाराला विशेष प्राधान्य दिल्याने मागणी अधिक आहे. आयात होणारी बहुतांश फळे महाग असल्याने मॉल्स, रेस्टॉरंटमधून प्रामुख्याने मागवली जातात. 0 ते 5 डिग्री सेल्सियस तापमानात ही फळे साठवून ठेवावी लागतात. त्यामुळे स्थानिक बाजारात ती सहसा दिसत नाहीत.

किरकोळ बाजारातही सर्व परदेशी फळे 200 ते 300 रुपये किलोच्या घरात मिळतात. पण किवी, ड्रॅगनसारखे फळ नगावर मिळते. 20 ते 25 रुपयांना एक असा त्याचा भाव असतो. या फळांना वेगळी चव असते. त्यामुळे या फळांची मागणीनुसार आयात केली जाते.
– दत्तात्रय कळमकर, फळ विभागप्रमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.


अलीकडच्या काळात विदेशी फळांची आवक वाढली असून, त्यास मोठी मागणी आहे. यामुळे ग्राहकांना बारा महिने हवे ते फळ खायला मिळते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
– सलीम मस्तानसाब बागवान, फळ व्यापारी, मार्केट यार्ड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)