मला ज्वालामुखीशी बोलावे लागले; सुषमा स्वराज यांचे अनोखे उत्तर

नवी दिल्ली – पासपोर्ट, व्हिसा संबंधी असलेल्या तक्रारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ट्विटरवरच्या माध्यमातून सोडवितात. ट्विटरवर सक्रीय राहणाऱ्या सुषमा स्वराज आपल्या हजरजबाबी उत्तरामुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी पुन्हा एकदा अशाच आगळ्या-वेगळ्या उत्तरासाठी सुषमा स्वराज चर्चेत आल्या आहेत. एका तरुणाने सुषमा स्वराज यांना ट्विटरवर टॅग केले कि, इंडोनेशियामधील बाली या बेटावर आता प्रवास करणे सुरक्षित आहे का? असे त्यांनी विचारले. यावर सुषमा स्वराज यांनी आपल्या अंदाजात उत्तर दिले कि, त्यासाठी मला ज्वालामुखीशी चर्चा करावी लागेल.

सुशील कुमार राय असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सुषमा स्वराज यांना ट्विटरवर विचारले कि, आमची ११ ते १७ ऑगस्ट बाली या बेटावर ट्रीप जाणार आहे. या बेटावर प्रवास करणे सुरक्षित असेल का? याबाबत आपल्या सरकारने कोणतीही सूचना जारी केली आहे का? कृपया लवकर उत्तर द्यावे, असे त्यांनी ट्विटरवर म्हंटले आहे. एवढ्यावरच न थांबता सुशील राय यांनी त्यांची पोस्ट इंडोनेशियामधील जर्काता येथील भारतीय दूतावास आणि बालीमधील भारतीय वाणिज्य दूतावासालाही टॅग केली आहे.

-Ads-

यावर सुषमा स्वराज यांनी ट्विट केले कि, यासाठी मला त्या ठिकाणी असणाऱ्या ज्वालामुखीशी बोलावे लागेल, असे उत्तर त्यांनी दिले. सुषमा स्वराज यांच्या ट्विटला अनेक जणांनी पाठींबा दर्शवित प्रश्न विचारणाऱ्याला ट्रोल केले आहे तर अनेकांनी टीकाही केली आहे.

दरम्यान, बालीमध्ये मागच्याच आठवड्यात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या उद्रेकात ज्वालामुखीच्या तब्बल २ हजार मीटर उंच राख फेकली गेली होती. यामुळे जवळपास ७ हजार नागरिकांना स्थलांतरित करावे लागले असून विमानसेवा खंडित झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)