कलंदर : अंदाज नववर्षाचा

-उत्तम पिंगळे

परवाच नवीन वर्षांच्या शुभेचा देण्याकरता प्राध्यापक मराठमोळंयाच्या घरी गेलो.प्राध्यापक म्हणाले की बरेच दिवसांनी येणे केले. मी म्हणालो की ख्रिसमसच्या सुट्टीत येणार होतो पण मग ठरवले की नवीन वर्षातच जाउ. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी प्राध्यापकांना विचारले कि नवीन वर्षांत काय घडेल.एकंदरीत नवीन वर्ष कसे काय जाईल असा आपला अंदाज आहे? त्यावर प्राध्यापक म्हणाले की मी तूझा नवीन वर्षाचा लेख वाचला तू जे लिहीले आहेस तसेच काही असणार आहे नवीन काही होईल असे नाही तरीही काही गोष्टी नक्कीच घडतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक बाबतीत अमेरिका आपले स्वतःचे हित जपण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे पूर्वी ते तसे करत नव्हते असे नाही पण यात थोडा फरक असणार आहे.म्हणजे जागतिक स्तरावर अमेरिका सर्वत्र असते उदारणार्थ जरा कुठे काही खट्ट्‌ झाले की अमेरिका त्यात हस्तक्षेप करणार. पण आता नुकतेच अमेरिकेने सीरिया व अफगाणिस्तानातून बरेचसे सैन्य माघारी घेतलेले आहे. अर्थात त्यामुळे तेथे दहशतवाद पुन्हा डोके काढू शकतो हा भाग वेगळा.

दुसरे म्हणजे जागतिक अर्थव्यवहार हा तेलाच्या किमतीवर अवलंबून असतो. विशेषता भारतासारखा देश यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के तेल आयात केले जाते अशावेळी तेलाची किंमत ही भारताच्या दृष्टीने महत्त्वाची असते. एक जानेवारी पासून कतारने ओपेक मधून आपले सदस्यत्व काढून घेतले आहे. महत्त्वाचा देश ओपेक मधून बाहेर पडणे भारताच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. कतार बाहेर पडल्यामुळे तेल निर्माण देशांचे तेला वरील किंमतीचे नियंत्रण कमी होईल.

तसेच भारतानेही यूएई या देशांशी रुपया चलनातून व्यापार करार करण्याचा करार केलेला आहे. अशा वेळी आपण या देशांकडून रुपयांच्या चलनातून तेल खरेदी करू शकतो त्यामुळे आपले डॉलर वरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे आगामी वर्षात डॉलर पुन्हा 70 पेक्षा जास्त जाईल असे वाटत नाही तो 70आसपास किंवा कमीच राहील. आपण अनेक देशांशी रुपयांच्या माध्यमातून व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात यश आल्यास अजूनही चांगले होईल.

अर्थात जे लोक आपल्याकडून भरपूर काही खरेदी करतात तेच यास राजी होतील तरीही आपला फायदाच आहे कारण डॉलर वरील आपले अवलंबित्व नक्कीच कमी होईल. एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून वरील विवेचन जागतिक स्तरावरील अभ्यास करून सांगितले आहे. देशांतर्गत आता निवडणुकीचे वर्ष असल्याने आगामी चार पाच महिने अनेक घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

कर्जमाफी हा विषय ऐरणीवर आलेला आहे. तूला माहित आहे का की शेतकरी कर्जमाफी ही बड्या शेतकऱ्यांसाठी असते कारण छोटे शेतकरी बॅंकातून कर्ज न घेता सावकारांकडून घेतात अशी कर्जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र नसतात. निवडणूक वर्ष असल्याने यात काही महत्त्वाचा फरक पडेल असे वाटत नाही. पण याव्यतिरिक्त सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती व सोयी दिलेल्या आहेत त्याचा फायदा त्यांनी नक्कीच घ्यावा. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू झालेला आहे त्यामुळे त्यांची मजाच आहे.

आता राहता राहिला तो नोकरदार व मध्यम वर्ग जो नियमीतपणे टॅक्‍स भरत असतो. आता यांच्या आयकरावर सूट मिळावी हीच यांची अपेक्षा आहे. मला वाटते कि त्यात नवीन वर्षात काय तरी नक्की होईल. किमान करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढेल ज्येष्ठ नागरिकांनाही आणखी दिलासा मिळेल व कमीत कमी कर दर असण्याची उत्पन्न मर्यादाही वाढावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)