पाकिस्तानात हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर 

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात दोन हिंदू अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांचे लग्न लावून धर्म बदलण्यात आले आहेत. होळी साजरी करत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. या मुली 13 आणि 15 वर्षे वयाच्या आहेत.या घटनेनंतर पाकिस्तानातील हिंदूंनी तीव्र निदर्शने केली आहेत. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली आहे.

पाकिस्तान हिंदू वेलफेअर ट्रस्टचे प्रमुख संजेश धंजा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, रविना आणि रीना या दोघींचे सिंध प्रांतातील घोटकी येथून अपहरण करून लागण लावण्यात आले व यानंतर त्यांचे धर्म बदलण्यात आले. अशा प्रकारच्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानात नेहमीच होत आल्या आहेत. यावर आम्ही वारंवार आवाज उठवत असतो मात्र , पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. रविना आणि रीना यांच्यासोबतच याच परिसरातील कोमल आणि सोनिया या दोन मुलींचे देखील अपहरण करण्यात आले असून जबरदस्तीने त्यांचे मुस्लिम तरुणांशी लग्न लावून देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)