सीबीआयमधील भांडणांमुळे कारवाई करावी लागली : केंद्र सरकार 

नवी दिल्ली : सीबीआयचे अध्यक्ष अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जनहितार्थ घेण्यात आला होता असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयामध्ये अलोक वर्मा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी सामान्य जनतेचा सीबीआय या संस्थेतील विश्वास अखंड ठेवण्यासाठी अशा असाधारण परिस्थितीमध्ये सरकारला अलोक वर्मांवर कारवाई करावी लागली असे सांगितले आहे.

या बाबत न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडताना वेणुगोपाल पुढे म्हणाले की, “वृत्त वाहिन्यांमध्ये सीबीआय मधील अंतर्गत वादाच्या बातम्या दाखवल्या जात होत्या तसेच सीबीआयच्या दोन्ही सर्वोच्च अधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका जाहीर केल्याने सीबीआय ही संस्था उपहासाचा विषय बनली होती.

-Ads-

तत्पूर्वी केंद्र सरकारने सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा, विशेष महासंचालक राकेश अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांना सक्तीचा रजेवर पाठवण्याचा आदेश काढला होता. या आदेशाविरोधात अलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)