सर्वाधिक कमाई करणाऱ्याच्या यादीत बाॅलिवूडमधील ‘या’ अभिनेत्यांचा समावेश

फोर्ब्स या मासिकांने २०१८ वर्षाची यादी केली जाहीर

नवी दिल्ली – फोर्ब्स या मासिकाने २०१८ या वर्षाकरिता जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतामधून बाॅलिवूडमधील दंबंग अभिनेता सलमान खान आणि खिलाडी म्हणून अोळख असलेला अक्षय कुमार या अभिनेत्यांना या यादीत स्थान मिळविले आहे.

जगप्रसिध्द मासिक फोर्ब्स यांनी २०१८ या वर्षासाठीची यादी जाहीर केली असून यामध्ये अक्षय कुमार हा सातव्या स्थानी तर सलमान खान हा नवव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावरील अक्षय कुमारची वार्षिक कमाई ही २८३ कोटी आहे. तर सलमान खान यांची वार्षिक कमाई २६९ कोटी रूपये असल्यांच फोर्ब्स या मासिकाने नमूद केले आहे.

हाॅलिवूडचा सुपरस्टार जाॅर्ज क्लूनी हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. जाॅर्ज क्लूनी याची वार्षिक कमाई १ हजार ६७२ कोटी रूपये इतकी आहे. दुसऱ्या स्थानी ड्वेन जाॅन्सन (८६७ कोटी), तिसऱ्या स्थानी राॅबर्ट डाउनी (५६६ कोटी), चौथ्या स्थानी ख्रिस हेम्सवर्थ ( ४५१ कोटी), पाचव्या स्थानी जॅकी चॅन (३१८ कोटी), सहाव्या स्थानी विल स्मिथ (२९३ कोटी), आठव्या स्थानी अॅडम सॅडलर (२७६ कोटी) तर दहाव्या स्थानी ख्रिस इवान्स (२३७ कोटी) हा अभिनेता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)