दोन-चार दिवस थांबून योग्य निर्णय घेऊ : दिलीप गांधी

अहमदनगर: “मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. लोकसभेत भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याबाबत वरिष्ठांनी काही निर्णय घेतले आहेत. दोन-चार दिवसांत चांगला निर्णय होऊ शकतो,’ अशी आशा खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली.

खासदार कार्यालयात गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गांधी म्हणाले, “मुख्यमंत्री आणि केंद्रातील नेत्यांना दोन-चार दिवसांमध्ये भेटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहे. काही निर्णय राजकीय असू शकतात. त्यातून आपणाला मार्ग काढता येऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. कोणाला दुखवत आपल्याला काम करायचे नाही. त्यामुळे दोन-चार दिवस आपण थांबून योग्य तो निर्णय घेऊ.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.सुजय विखे यांच्या प्रवेशाच्या वेळी लोकसभेच्या तिकिटाचे स्पष्ट संकेत दिले. खासदार दिलीप गांधी यांना यानंतरही अजूनही आशा कायम आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)