पालखीसाठी दोन दिवस पाणी कपात रद्द

24 तास सुरू राहणार पाणीपुरवठा


जादा नळजोडही उपलब्ध करून देणार

पुणे – शहरात दोन दिवस मुक्कामी येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सध्याची पाणीकपात रद्द करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान पुण्यात दोन दिवस 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या शिवाय, या सोहळ्यानिमित्त शहरात मुक्कामी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शहरात सुमारे 100 हून अधिक ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक नळकोंडाळी उभारली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

खडकसवाला धरणसाळखीने तळ गाठला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरात 20 ते 25 टक्के पाणी कपात असून शहरात एकच वेळ पाणी देण्यात येत आहेत. त्यातच पुसंत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 26 जून पुण्यात येणार आहे. तसेच दि.27 जून रोजी या दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी असतील. त्या शुक्रवारी सकाळी महापालिका हद्दीतून पुढे मार्गस्थ होणार आहेत. या काळात शहरात लाखो वारकरी मुक्कामी असतात. पाणी कपातीमुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हे दोन दिवस कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुक्‍कामस्थळी सार्वजनिक नळकोंडाळी
पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात वारकरी मोठ्या प्रमाणात मुक्कामी राहत असल्याने या भागात तात्पुरती सुमारे 100 नळकोंडाळी उभारण्यात येणार आहेत. या भागातील सार्वजनिक नळकोंडाळे, ज्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे, तेथील नळकोंडाळ्यांचीही दुरूस्ती करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here