सहा वर्षाच्या मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे – घरात बोलावून सहा वर्षाच्या चिमुकलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या 25 वर्षीय नराधम तरूणाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यानी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

सुरज तानाजी सोनकांबळे (वय 25, रा. उरळी कांचन, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास उरळी कांचन येथे घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ऍड. सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित घरात एकटीच होती. त्याने तिला त्याच्या घरात बोलाविले. तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना, ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनील हांडे यांनी केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 नुसार 3 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, तर भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)