आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी

दहा कोटी
पीक नुकसानीपोटी दोन हजार कोटींची तरतूद
4 हजार 284 कोटींच्या पुरवण्या मागण्या साद

मुंबई – आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत करण्यासाठी 10 कोटी 82 लाखांच्या निधीसाठी पुरवण्या मागण्यांत तरतूद करण्यात आली आहे. तर 2018च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून दोन हजार कोटी, तर कृषीपंप आणि यंत्रमागधारक ग्राहकांना विद्युत प्रशुल्कात दिलेल्या सवलतीपोटी एक हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी 4 हजार 284 कोटी 65 हजार रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांवर उद्या (मंगळवार) चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. आजच्या पुरवणी मागण्यांमुळे 2018-19 या मावळत्या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीचा आकडा 36 हजार कोटीवर गेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत पावणेदोन लाख कोटीच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत पुरवणी मागण्या सादर केल्या. या माध्यमातून स्वातंत्रय सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी 482 कोटी रुपये, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे कृषीपंपाचे ऊर्जीकरण करण्यासाठी 478 कोटी, दूध खरेदी तसेच अतिरिक्त दुधाचे दूध भुकटीतील रूपांतरणासाठी 305 कोटी, राष्ट्रीय निवृत्तवेतन योजनेनुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील एकत्रित अंशदानावरील व्याज प्रदानासाठी 142 कोटी, तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना सौर कृषी पंप पुरविण्यासाठी 73 कोटी रुपयांची, तर सरकारी रुग्णांलयातील सीटीस्कॅन यंत्रे खरेदी करण्यासाठी 7 कोटी 83 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)