पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत मारा 

जम्मू – पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात पाकिस्तानची छी-थू होत असूनही त्या देशाच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करत सलग दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत मारा केला. त्यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा आणि कलाल क्षेत्रांना लक्ष्य केले.

नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या त्या क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला. त्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 मध्ये शस्त्रसंधी करार झाला. मात्र, त्या शस्त्रसंधीचा पाकिस्तानकडून वारंवार भंग केला जातो. मागील वर्षभरात (2018) पाकिस्तानी सैनिकांनी तब्बल 2 हजार 936 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. पाकिस्तानी कुरापतींचे ते प्रमाण मागील 15 वर्षांतील सर्वांधिक ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)