बालकांच्या प्रवेशासाठी आधार बंधनकारक करणे अयोग्य

नवी दिल्ली – लहान बालकांना नर्सरीत प्रवेश देताना 12 आकड्यांची बायोमेट्रिक संख्या देण्याची अट घालू नका, असे निर्देश भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) शाळांना दिले आहेत. शाळांनी असे केले तर सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशाचे ते उल्लंघन ठरेल, असा इशारा यूआयडीएआयने दिला आहे.

दिल्लीतील 1,500 पेक्षा अधिक खासगी शाळांमध्ये नर्सरी आणि अन्य वर्गांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांच्या नावावर आधार क्रमांकाची मागणी करण्यात येत आहे, अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर यूआयडीएआयने हा इशारा दिला आहे. आम्हालाही अशा प्रकारच्या बातम्या मिळाल्या आहेत, असे यूआयडीएआयने म्हटले असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळांतील प्रवेश तसेच बालकांच्या अन्य सुविधांसाठी आधार उपलब्ध करणे अनिवार्य करता येणार नाही, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय भूषण पांडेय यांनी सांगितले. खरे तर शाळांनी बालकांना आधारशिवाय प्रवेश द्यावा आणि प्रवेश दिल्यानंतर शिबिर घेऊन त्यांचे आधार कार्ड बनवावे, असे पांडेय म्हणाले. कोणत्याही बालकाला आधारवाचून प्रवेशापासून वंचित ठेवता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)