राम मंदिरासाठी आम्ही अनंतकाळ वाट पाहू शकत नाही – विहिंपची भूमिका

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आम्ही अनंतकाळ वाट पाहू शकत नाहीं. सरकारने या प्रकरणात त्वरीत अध्यादेश काढून मंदिराचे काम मार्गी लावावे अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका टीव्ही मुलाखतीत बोलताना राम मंदिर प्रकरणातील कायदेशीर सुनावणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच या विषयी निर्णय घेता येईल असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना विश्‍व हिंदु परिषदेतर्फे ही भूमिका मांडण्यात आली.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय हंगामी कार्याध्यक्ष अलोककुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अयोध्या प्रकरणातील कोर्टातील सुनावणी बराच काळ लांबली आहे. आणि अजून ती कधी पुर्ण होईल याची काहीही शाश्‍वती नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात अनंतकाळासाठी वाट पाहू शकत नाही किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात सरकारने अध्यादेश काढून मंदिराचा मार्ग प्रशस्त्र करणे हाच एक पर्याय आता सरकारपुढे आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)