मतांसाठीच काँग्रेस पक्षाने समझोता स्फोट प्रकरण रखडत ठेवले – अरुण जेटली

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने नेहमीच मतांसाठी हिंदू दहशतवादाचा सिद्धांत रचला असल्याचा गंभीर आरोप केला. केवळ मतांसाठीच काँग्रेस पक्षाने समझोता स्फोट प्रकरण एवढी वर्षे रखडत ठेवले असल्याचा आरोपही अरुण जेटली यांनी केला आहे.

“समझोता स्फोट प्रकरणाचा सर्व तपास २००७-०८-०९ मध्ये झाला आहे. तरी देखील १०-१० वर्ष आरोपींना जेलमध्ये ठेवण्यात आले, आरोपपत्र दाखल केले, पण न्यायाधीशांनी कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणताही पुरावा नसलेले आहे.” असे अरुण जेटली म्हणाले.  पुढे बोलताना, “कोणताही पुरावा नसताना हिंदू समाजाची बदनामी करण्यासाठी हिंदू दहशतवादाचा उल्लेख करण्यात आला आणि चुकीच्या लोकांना पकडण्यात आले, पण शेवटी न्यायालयाने योग्य निर्णय दिला.” असे अरुण जेटली म्हणाले. त्यामुळे हिंदूंना दहशतवादी करण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यासाठी युपीए आणि काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका जेटलींनी केली. आणि त्यासाठी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता २० मार्च रोजी  कोर्टाने केली. बारा वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी पंचकुलाच्या एका विशेष एनआयए ( NIA ) कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला होता. एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी समझोता स्फोट प्रकरणाच्या निकालाची प्रत सार्वजनिक केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)