फुटबाॅल : वीस वर्षाखालील भारतीय फुटबाॅल संघाने अर्जेंटिनाचा केला पराभव

मेड्रिड – वीस वर्षाखालील भारतीय फुटबाॅल संघाने कोटिक कप स्पर्धेत जागतिक विजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अर्जेटींनाचा 2-1 असा पराभव केला आहे.

सामन्यात भारताच्या दीपक टांगरी याने 4 थ्या मिनिटाला तर अनवर अली याने 68 व्या मिनिटाला गोल केला. तर पराभूत संघाकडून गिल या खेळाडूने 72 व्या मिनिटाला गोल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी 1984 साली कोलकत्ता येथे नेहरू कप स्पर्धेत दोन्ही देशाचे संघ एकमेकांविरूध्द सामना खेळले होते, ज्यामध्ये भारतीय संघाला 0-1 असा पराभव स्विकारावा लागला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)