फुटबॉल स्पर्धा: विद्याभवन, विबग्योर, स्प्रिंग डेल स्कुल संघांची विजयी सलामी

ग्रीनबॉक्‍स आंतरशालेय 12 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा

पुणे: विद्याभवन स्कूल अ आणि ब, विबग्योर स्कूल अ आणि ब, स्प्रिंग डेल स्कूल अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून ग्रीनबॉक्‍स आंतरशालेय 12 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. ग्रीनबॉक्‍स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कॅसल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत ऍरोन मेंडिसने (2, 5 व 15वे मि.) केलेल्या तीन गोलच्या जोरावर विद्या भवन स्कूल ब संघाने दस्तूर स्कूल संघाचा 6-0 असा धुव्वा उडविला. तसेच विद्या भवन स्कूल अ संघाने सिम्बायोसिस एसएससी ब संघाचा 3-0 असा, तर विबग्योर स्कूल ब संघाने सिम्बायोसिस एसएससी अ संघाचा 4-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. आणखी एका चुरशीच्या लढतीत विबग्योर स्कूल अ संघाने स्प्रिंग डेल स्कूल ब संघाचे आव्हान 2-1 असे मोडून काढले. विजयी संघाकडून शील घटानीव आयुश कटनकर यांनी गोल केले.
या स्पर्धेत दस्तूर हायस्कूल, विद्याभवन स्कूल अ आणि ब संघ, सिम्बायोसिस एसएससी (एलसीआर) अ आणि ब संघ, विबग्योर स्कूल अ आणि ब, स्प्रिंग डेल स्कूल अ आणि ब संघ, एंजल हायस्कूल लोणी, जेएन पेटिट स्कूल अ आणि ब संघ, एंजल हायस्कूल उरळी कांचन, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, आर्यन स्कूल, सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, हचिंग्ज हायस्कूल, द ऑर्चिड स्कूल, सीएम इंटरनॅशनल स्कूल, बिशप्स हायस्कूल (कॅम्प), माउंट सेंट पॅट्रिक स्कूल, डॉन बॉस्को हायस्कूल, सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, कस्तुरबा गांधी स्कूल, बिशप्स कल्याणीनगर, पुणे पोलीस पब्लिक स्कूल, विद्यांचल स्कूल व एचईएम गुरुकुल स्कूल या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

सविस्तर निकाल –

पहिली फेरी- स्प्रिंग डेल स्कूल अ- 2 (ईशान केमकर 14 व 16 वे मि.) वि.वि. आदित्य इंटरनॅशनल स्कूल- 1 (पंकज चौधरी 19वे मि.);
विबग्योर स्कूल अ- 2 (शील घटानी चौथे मि., आयुश कटनकर 8 वे मि.) वि.वि. स्प्रिंग डेल स्कूल ब- 1 (पार्थ भरेकर तिसरे मि.);
विबग्योर स्कूल ब- 4 (आदित्य गोयल दुसरे मि., वैभव राजेश 3 व 18 वे मि., सिद्धांत आडमुठे 15 वे मि.) वि.वि. सिम्बायोसिस एसएससी अ- 0;
विद्या भवन स्कूल ब- 6 (ऍरोन मेंडिस 2, 5 व 15 वे मि., आदित्य धुमाळ 9 वे मि., अंकित गवारे 20 वे मि., ओम राक्षे 21 वे मि.) वि.वि. दस्तूर स्कूल- 0; विद्या भवन स्कूल अ- 3 (आदित्य पिल्लई तिसरे मि., नील दगडे 7 व 16 वे मि.) वि.वि. सिम्बायोसिस एसएससी ब- 0.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)