सेरी ए लीग फुटबॉल स्पर्धा : इंटर मिलानची स्पालवर मात

मिलान  -इंटर मिलानने उत्तरार्धात केलेल्या दोन गोलच्या बळावर स्पालचा 2-0 असा पराभव करत सेरी ए लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली असून पुढील आठवड्यात एसी मिलानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी इंटर मिलानचे खेळाडू लयीत परतले आहेत.

इंटर मिलान आणि स्पालकडून पूर्वार्धात एकमेकांविरुद्ध आक्रमक खेळ केला मात्र, दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र, उत्तराधारात इंटर मिलानच्या मॅट्टेओ पोलिटॅनो आणि रॉबटरे गागलिआर्डिनी यांनी अनुक्रमे 67 आणि 77 व्या मिनिटाला गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह इंटर मिलानचा संघ एसी मिलाननंतर चौथ्या
स्थानावर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)