विजेतेपदापेक्षा ‘वादाची’ चर्चा जास्त

लंडन – इंग्लीश फुटबॉलमधील तगडे संघ मॅंचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यात केरबाओ चषकाचा अंतिम सामना झाला. निर्धारित वेळेत गोल करण्यात दोनही संघ अपयशी ठरल्याने सामन्याचा अनिकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये ठरवण्यात आला. मॅंचेस्टर सिटीने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवत विजेतेपद पटकाविल;परंतु मैदानात असा एक प्रसंग घडला ज्यामुळे मोठा वाद उभारला आणि ज्याची चर्चा मॅंचेस्टर सिटीच्या विजयापेक्षाही जास्त होत आहे.

दुसरे सत्र संपण्यास काही अवधी बाकी असताना चेल्सी संघाचे प्रशिक्षक मौरीझिओ सारी यांनी गोलरक्षक कोपाला बदली करण्याचा निर्णय घेतला आणि अन्य गोलरक्षकला तयार केले. साईडलाईन पंचानी बदली करण्यासाठी फलक हातात घेतले तरी कोपा बदली होण्यास तयार नव्हता. त्याने प्रशिक्षकाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि कितीही सूचना केल्या तरी तो मैदानाबाहेर आलाच नाही. त्यावर संतापलेले सारी सामना सोडून ड्रेसींगरूममध्ये परतण्यास निघाले आणि अखेर जबाबदारीचे भान ठेऊन परतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा सामना मॅंचेस्टर सिटीने जिंकल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सारी म्हणाले, हा प्रसंग योग्य संवाद होऊ न शकल्याने झाला आहे. परंतु सामना पाहणाऱ्यांना नेमके काय झाले होते याचे अचूक कल्पना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)