इस्को चे रियाल माद्रिद मधील भविष्य धोक्‍यात ?

माद्रिद – स्पेन आणि रियाल माद्रिद क्‍लबचा खेळाडू इस्को याचे संघातील स्थान धोक्‍यात आले आहे. मागील काही काळापासून तो तंदरुस्तीसाठी मिळवण्यासाठी झगडत आहे तर जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधीचा फायदा घेण्यात कमी पडत असल्याने त्याच्यावर ही येत आहे.

रियाल माद्रिद विरुद्ध रोमा यांच्यातील चॅम्पियन्स लीगच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये इस्को बदली खेळाडू म्हणूनही संधी मिळाले नाही. सामन्यानंतर रियाल माद्रिदचे प्रशिक्षक सॅन्तीयागो सोलारी म्हणाले, त्याची तंदुरुस्ती पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे हा व्यवस्थापनाचा निर्णय होता, बाकी काही नाही.

फुटबॉलमध्ये कोणतेही ठरावीक 11 खेळाडू नसतात किंवा राखीव खेळाडू नसतात. जेव्हा तुम्हाला प्रशिक्षक संघात सत्यह्ण देतील तेव्हा सदैव तुम्ही 100 टक्के देण्यासाठी तयार हवे. परंतु, मागील आठ सामन्यात त्याची संघात निवड करूनही पाच वेळा त्याला राखीव खेळाडू म्हणून बसवणे. सोलारीयांच्या रणनीती मधून काही वेगळेच स्पष्ट होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)