नवी दिल्ली : मोहन बागान संघाने गुरूवारी आय-लीग मधील सामन्यात नेरोका एफसी संघाचा ३-० ने पराभव करत विजय संपादित केला. यासह मोहन बागान संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
FULL-TIME! Britto plays Tursunov through, he slips it past the keeper as the referee blows the final whistle 💥
NFC 0-3 MB
Watch 👀 Live 📺 on @DSportINLive, Kolkata TV
Streaming 🖥 on 👉 https://t.co/ZSazygKZDu#NFCMB ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/2ksOSRf9by
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 23, 2020
मोहन बागान संघाकडून नोंगदाब्मा नाओरेमने २७ व्या मिनिटाला पहिला तर पापा दियावाराने ५३ व्या मिनिटाला दुसरा आणि कोमरोन तुर्सनोवने अतिरिक्त (९०+४) वेळेत संघासाठी तिसरा गोल केला.
या विजयासह बागान संघाचे ९ सामन्यात २० गुण झाले असून गुणतालिकेत ते अव्वलस्थानी पोहचले आहे. तर नेरोका एफसी चा संघ ८ सामन्यातील ८ गुणांसह गुणतालिकेत ६ व्या स्थानावर आहे.