मेस्सी माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही – पेले

साऊ पाऊलो – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी लियोनेल मेस्सी एक कौशल्य असल्याने तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही असे मत फोलहा डी साऊ पाऊलो या वाहिनीसमोर मांडले आहे.

लियोनेल मेस्सीच्या खंबीर समर्थकांपैकी एक असलेल्या पेले यांनी आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण? या प्रश्नसंबंधी मेस्सी आणि स्वतःच्या तुलनेबाबत आपले मत व्यक्त करताना ते म्हणाला, तो फक्त डाव्या पायाने चांगला खेळतो. हेडिंग कौशल्य आणि उजव्या पायाने खेळण्याच्या क्षमतेत तो कमी पडतो. यामुळे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. परंतु, मी अजूनही त्याला मागील दहावर्षातील सवोत्तम खेळाडू मानतो. माझ्यामते मॅरेडोना देखील त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.

या मुलाखतीत त्याने स्वताच्या आरोग्याबद्दल देखील माहिती दिली आणि पुढे म्हणाले, मी सध्या बारा आहे परंतु, 100 टाकी तंदुरुस्त नाही. पेले हे 78 वर्षाचे असून त्याच्यावर 5 शाश्‍त्रक्रिया झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
17 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)