गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धा : सांगवी एफसीचा व्होबाला धक्का

पुणे- येथे सुरु असलेल्या गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेत खुल्या गटाच्या उदघाटनाच्या सामन्यात सांगवी एफसी संघाने व्होबा संघाचा 3-1 असा पराभव केला. सांगवी एफसी तर्फे वैभव पाटील अमित ढोरे आणि शुभम सावंत यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवले तर व्होबासाठी एकमेव गोल शॉन बॉब याने नोंदवला.

सुरुवातीपासून सामन्यावर सांगवी एफसी संघाचे वर्चस्व होते. आक्रमक खेळ करत त्याने 10 व्या आणि 15व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 2-0 अशे आघाडी मिळवून दिली.

-Ads-

या दोन धक्क्‌यातून सावरत व्होबासंघ 35 व्या मिनिटाला एक गोल नोंदवत सामना एकतर्फी होणार नाही याची जबाबदारी घेतली. परंतु, 40 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सांगावी एफसी संघाने हा सामना 3-2 असा आपल्या नावे केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)