फिनआयक्‍यू संघाचा 5-1 ने विजय

गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धा

पुणे – येथे सुरु असलेल्या गुरुतेंग बहादूर फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी फिनआयक्‍यू संघाने पीसीएच लायन एफसी संघाचा 5-1 असा पराभव करत पुढची फेरी गाठली आहे. या सामन्यात फिनआयक्‍यू संघाने आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन घडवताना सामन्यात पहिल्या मिनिटांपासून दबदबा निर्माण केला. चौथ्याच मिनिटाला फिनआयक्‍यू संघाच्या श्रीकांत मोलनगिरी याने गोल करत गोलचे खाते उघडले. त्यानंतर सहाव्या मिनिटाला प्रकाश थोरात आणि 14 व्या मिनिटाला आदर्श रोतूलु यांनी गोल नोंदवत पहिल्या पंधरा मिनिटातच फिनआयक्‍यू संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.

आणखी दोन गोल करत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. तर पीसीएच लायन एफसी संघासाठी अभिषेकने एकमात्र गोल 55व्या मिनिटाला केला.

अन्य सामन्यात गोल्डन फिदरने बोपोडी एफसीवर 1-0 विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात स्ट्रायकर एफसी संघाने किरकीयांस एससी संघाचा 2-1 असा पराभव केला. तर रेंग हील्स संघाने वनवाडी एससी क्‍लबवर 1-0 असा विजय मिळवत विजयी आगेकूच केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)