गुरुतेग बहाद्दूर फुटबॉल स्पर्धा : इन्फंट फुटबॉल क्‍लबचा एसकेएफ संघावर विजय

पुणे – येथे सुरु असलेल्या गुरुतेग बहाद्दूर फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात इन्फंट फुटबॉल क्‍लबने एसकेएफसंघावर टाई ब्रेकरमध्ये गोल झळकावताना विजयी आगेकूच केली.

यावेळी झालेल्या सामन्याच्या सुरूवातीपासूनच इंन्फंट आणि एसकेएस संघांनी चांगल्या चाली रचत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या होत्या. मात्र, दोन्ही संघांच्या बचाव फळीणे चांगली कामगिरी करत संपुर्ण सामन्यात गोल होऊ दिला नाही त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरमध्ये झाला.

यावेळी इन्फंट कडून इलियास नायडू, विकी पिल्ले, लोउविन डी गामा आणि सदानंद रामासामीने गोल केला. तर, एसकेएससंघाकडून कुलदीप भंडारी, हर्शल मुटकुले, निरज माने यांनी गोल केला. यावेळी एसकेएफच्या तुषार दुर्गा आणि कृष्णा दुर्गायांना गोल करन्यात अपयश आल्याने त्यांना पराभवाचा झतका बसला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)