आता भारताला हरवणे सोपे नाही

आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : सुनिल छेत्रीचे भारतीय चाहत्यांना आश्वासन

अबुधाबी – चीन आणि ओमान संघांना अलीकडे आम्ही घाम फोडला. दोन्ही सामने अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता भरपुर बळावला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला हरवणे अवघड आहे असा इशारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने अन्य संघांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अ.भा. फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर दिलेल्या मुलाखतीत छेत्री म्हणाला की, मी भारतीयांना आश्‍वस्त करू इच्छितो, की जे संघ आमच्याविरुद्ध खेळतील त्यांना आमच्यावर विजय मिळविणे सोपे जाणार नाही. आम्ही पराभवाविरुद्ध पेटून उठत असल्याचे अलीकडे सिद्ध झाले आहे. आम्ही योजनेनुसार वाटचाल करीत आहोत. सलग दोन आशियाई स्पर्धांत सहभागी होत असलेला छेत्री एकमेव भारतीय खेळाडू आहे.

पाच जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन आणि यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले आहे. रविवारी भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर अबुधाबी येथे यूएईविरुद्ध 10 जानेवारीला आणि शारजा येथे बहरीनविरुद्ध 14 जानेवारी रोजी भारतीय संघ सामना खेळेल.

आशियात 15व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेच्या तयरीचा भाग म्हणून चीन, ओमान आणि जॉर्डनविरुद्ध सामने खेळले. भारताने चीन आणि ओमानला बरोबरीत रोखले, तर जॉर्डनविरुद्ध सामना 1-2 ने गमावला होता. जागतिक फुटबॉलमध्ये भारत 97व्या, तर चीन 76 आणि ओमान 82व्या स्थानावर आहे. जॉर्डन संघ 109 व्या स्थानी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)