रोनाल्डो ‘बॉलोन डी ओर’ चा हकदार – रिव्हाल्डो

बार्सेलोना- ब्राझील आणि बार्सेलोना संघाचा माजी खेळाडू रिव्हाल्डो यांनी यंदाचा ”बॉलोन डी ओर पुरस्कार ख्रिस्टियानो रोनाल्डोला मिळायला हवा होता असे मत व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले, रियाल माद्रिदला मागील वर्षी चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकून देण्यात रोनाल्डोने महत्वाची भूमिका भाजवळी होती तर त्याने विश्वचषकात डेक्‍खील चांगली केले होती. त्यामुळे त्याला पुरस्कार मिळायला हवा होता.

पुढे बोलताना ते म्हणाले, मॉड्रीच हा चांगला खेळाडू आहे. त्याला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी त्याच्यावर टीका करत नाही. परंतु, यामध्ये रोनाल्डो आणि मेस्सी पुन्हा अग्रणी हवे होते. केवळ त्यांना पुरस्कार मिळू नये म्हणून की काय मॉड्रीचला निवडले आहे. या पुरस्काराची निवड प्रक्रिया दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

या पुरस्कारच्या शर्यतीत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये लियोनेल मेस्सीचे नाव नव्हते हे माझ्यासाठी नवल होते. मागील संपूर्ण वर्षात त्याने चांगला खेळ करत बार्सेलोना संघाला अनेक विजय मिळवून देत ला लिगा आणि कोपा डेल रे स्पर्धेची विजेतेपदे मिळवून दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)