झिकोंना जमले नाही ते लॉबेरा एफसी गोवासाठी करू शकणार का?

मुंबई : एफसी गोवा संघाने स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्याबरोबरील मुख्य प्रशिक्षकपदाचा करार आणखी एका वर्षाने वाढविला आहे. त्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) प्रतिस्पर्धी हताश झाले असतील, तर त्रयस्थ चाहत्यांना आनंद झाला असेल. झिको यांच्या कारकिर्दीत उपविजेता ठरलेल्या एफसी गोवा संघाला जेतेपद जिंकून देणे लॉबेरा यांना जमणार का याची उत्सुकता आहे.

लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ गेल्या मोसमापासून धडाकेबाज खेळाची दणदणीत पर्वणी चाहत्यांना देत आहे. सामन्याच्या सुरवातीपासून सतत आक्रमक खेळणाऱ्या एफसी गोवा संघाच्या प्रेमात सारेच चाहते पडले आहेत. त्या आधीच्या मोसमांमध्येही एफसी गोवा संघाचा खेळ आक्रमकच असायचा. ब्राझीलचे मातब्बर झिको तेव्हा मार्गदर्शक होते. लॉबेरा यांच्या कारकिर्दीत मात्र एफसी गोवा संघाच्या शैलीत एक प्रकारची पद्धतशीर प्रक्रिया विकसित झाली आहे. या संघाचा धडाका रोखणे प्रतिस्पर्धी संघांना जवळपास अशक्‍य ठरते आहे.

लॉबेरा यांनी सांगितले की, माझ्यासाठी हा अनुभव अप्रतिम आहे. व्यक्तीशः मी क्‍लबचे आभार मानू इच्छितो. याचे कारण क्‍लबच्या प्रमुख मंडळींनी आदर्श अशी वातावरणनिर्मिती केली आहे. त्यामुळे आम्ही संघातील मंडळी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर विकसित होऊ शकतो. आम्हाला आणखी बरेच काही करायचे आहे. मला निश्‍चयाने सातत्य राखावे लागेल. खेळात सुधारणा व्हावी आणि क्‍लबची भविष्यात क्षमतेनुसार कामगिरी व्हावी म्हणून मला दररोज स्वतःसमोर आव्हान ठेवावे लागेल.

झिको यांच्या कारकिर्दीत एफसी गोवाने 2015 मध्ये उपविजेतेपद मिळविले होते. त्यापेक्षा सरस कामगिरीचे अर्थात अंतिम अडथळा पार करण्याचे आव्हान एफसी गोवासमोर असेल. तेव्हा फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता. चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवाला 2-3 असे पराभूत व्हावे लागले होते. लॉबेरा आता संघाला जेतेपदापर्यंत नेणार का असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर होकारार्थी मिळणे शक्‍य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)