ज्युव्हेंटसच्या विजयात रोनाल्डो, मंडुकीच चमकले

file photo

रोम – ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मारिओ मंडुकीच यांनी एसपीएएल विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी एक गोल करत ज्युव्हेंटसला विजय मिळवून दिला. या विजयामुळे ज्युव्हेंटसने सिरीज ए (इटालियन लीग)मध्ये नऊ गुणांची आघाडी घेत पहिले स्थान मजबूत केले आहे.

रोनाल्डोने 28 व्या मिनिटाला गोल नोंदवत ज्युव्हेंटसचे खाते उघडले तर मंडुकीचने 60 व्या मिनिटाला गोल करत ज्युव्हेंटसच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

इटालीयन लीगच्या अन्य सामन्यात इंटर मिलानने फ्रोसीनन क्‍लबचा 3-0 असा पराभव करत नापोली संघासह संयुक्त दुसऱ्या स्थावर उडी घेतली आहे. दोन्ही संघाचे 28 गुण आहेत. नापोली क्‍लबचा पुढील सामना शेवटच्या स्थानी असलेल्या चिएवो संघाशी असल्याने ते या सामन्यात विजय मिळवून ज्युव्हेंटसची आघाडी कमी करतील अशी शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)