झिनेदीन झिदान पुन्हा होणार रियल माद्रिदचे प्रशिक्षक

माद्रिद  – “रियल माद्रिद’ या क्‍लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली असून अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पुढच्या मोसमात नवे प्रशिक्षक ज्युलेन लोपेतेगुई आणि सॅंतियागो सोलारीयांना देखील माद्रिदला जुण्या फॉर्ममधे आणन्यात अपयश आल्याने त्यांच्या जागी पुन्हा एकदा झिदान यांची निवड करण्यात आली आहे.

रियल माद्रिदमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षकपदावरून संभ्रमावस्था दिसून आली होती. कोपा डेल रे, चॅम्पियन्स ट्रॉफी, ला लिगा यासारख्या नामांकित स्पर्धांमध्ये “रियल माद्रिद’ला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात झिनेदिन झिदानला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

-Ads-

यानंतर प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या ज्युलेन लोपेतेगुई यांची देखील ऑक्‍टोबर महिन्यात अवघ्या 139 दिवसांत प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी सॅंतियागो सोलारी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सोलारी यांची कारकीर्द देखील पाच महिन्यांमध्येच संपुष्टात आली. त्यामुळे प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)