ग्रीनबॉक्‍स मिनी फुटबॉल स्पर्धा – लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात

पुणे -ग्रीनबॉक्‍स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्‍स मिनी फुटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत साखळी फेरीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्टस लॅन्सर्स संघाने रोहन बिल्डर्स बायसन्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली.

बावधन येथील गंगा लिजेंड्‌स फुटबॉल मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नॅथन स्टीव्हन, निखिल माळी, विश्‍वजीत पराडकर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स संघाने गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्‍सचा 3-2 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. अझहर खान(4,9मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर केएसएच बोल्ट्‌स संघाने गोल्डफिल्ड रेंजर्सला 4-1 असे पराभूत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्य लढतीत रोहित मुलचंदानी, अभिनव, शुभम यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गनर्स संघाने वायकिंगस्‌ संघावर 3-0अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)