पराभूत होणे हा बेंगळुरू एफसीच्या योजनेचा भाग?

मुंबई – हिरो इंडियन सुपर लीगच्या यंदाच्या मोसमाचा झंझावाती प्रारंभ केलेल्या बेंगळुरू एफसीचा चेहरा आता बदलला आहे. हिवाळी ब्रेकपूर्वी अपराजित राहिलेला संघ ब्रेकनंतर दोन वेळा हरला आहे. आता बेंगळुरू अजिंक्‍य राहिलेला नाही हे यावरून समजून येत आहे. मात्र, हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

गतवर्षी पदार्पणात अंतिम फेरी गाठलेल्या बेंगळुरूने गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर सफाईदार विजय मिळविला. मग त्यांना घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीने 2-2 असे बरोबरीत रोखले, पण सलग सहा विजय बेंगळुरूच्या दमदार फॉर्मची ग्वाही देत होते. फॉर्मात असल्यास हा संघ प्रतिस्पर्ध्यांना चितपट करीत होता, तर सर्वोत्तम फॉर्म नसला तरी कसून खेळ करीत विजय नोंदवित होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशिया करंडकासाठी दीर्घ हिवाळी ब्रेक घ्यावा लागल्यानंतर मात्र बेंगळुरूला चार सामन्यांत केवळ चार गुण मिळविता आले आहेत. यात मुंबई सिटी एफसी व चेन्नईयीन एफसी यांच्याविरुद्धचे पराभव समाविष्ट आहेत. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध पूर्वार्धातील ढिसाळ खेळानंतर त्यांना एक गुण कसाबसा मिळविता आला. नॉर्थईस्टविरुद्ध गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याची चपळाई आणि प्रतिस्पर्ध्याच्या आघाडी फळीने दवडलेल्या संधींमुळेच त्यांना निसटता विजय नोंदविता आला.

आधी 11 सामन्यांत अपराजित राहिलेल्या बेंगळुरूसाठी स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात असे खराब निकाल चांगले लक्षण ठरत नाहीत. आता बादफेरीचा निर्णायक क्षण येण्यास एका महिन्यापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे. अशावेळी चिंतेचे कारण आहे का? याविषयी बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी स्पष्ट केले की, मिकू तंदुरुस्त होता तोपर्यंत आम्ही एक संघ खेळवित होतो.

आता आम्ही खेळाडूंना आळीपाळीने खेळवू शकतो आणि विश्रांती देऊ शकतो. आता वेगळा संघ खेळत आहे. मोसमाच्या प्रारंभी खेळत असलेल्या संघाचे तंत्र या संघाकडे नाही. बाद फेरीत महत्त्वाचे ठरतील अशा खेळाडूंना थोडी विश्रांती मिळायला हवी असे मला वाटत होते. या टप्यासाठी खेळाडू तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोटेशन करणे गरजेचे होते. हीच आमची योजनाच आहे.

सलग दुसऱ्या मोसमात बेंगळुरू बाद फेरीच्या उंबरठ्यावर आहे. 15 सामन्यांतून 31 गुण त्यांनी मिळविले आहेत. गेल्या मोसमात बाद फेरीसाठी 30 गुण पुरेसे ठरले होते. त्यामुळे बेंगळुरूची आगेकूच यापूर्वीच नक्की झाली असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच कुआद्रात संघातील खेळाडूंचे रोटेशन करीत आहेत. एडमंड लालरींदीका, रिनो अँटो, गुरसीम्रत गील, अजय छेत्री व इतर काही खेळाडूंना ते गुणवत्ता दाखविण्याची संधी देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)