एलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद

पुणे – अंतिम फेरीत साऊथ सुदान संघाने सुदान संघाचा पेनल्टी शुट आऊटमध्ये 4-3 असा पराभव करत येथे पार पडलेल्या लखनौ पब्लिक कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजच्या वतीने वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.

अत्यंत संघर्षपूर्ण अशा सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. नियोजित वेळेत दोन्ही संघांनी एकमेकांवर धारदार आक्रमणे केली. सामन्याच्या बाराव्या मिनिटास सुदानच्या ईझबन, पॅट्रिक्‍स व ज्युडू यांनी मैदानाच्या डाव्या बाजूने अत्यंत सुंदर चाल रचली. सुदानच्या बचाव फळीला भेदत पॅट्रिक्‍सने ज्यूडूला सुंदर पास दिला. मात्र या पासचे गोलमध्ये रूपांतर करण्यास ज्यूडूला अपयश आले.

ज्यूडूने मारलेला जोरकस किक हा गोलरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. या आक्रमणाने सुदानच्या खेळाडूंनीही आपला खेळाचा वेग वाढविला. मात्र त्यांनाही मिळालेल्या संधीचे गोलात रुपांतर करण्यात अपयश आले. उत्तरार्धात दोन्हीही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. यामुळे उत्तरार्धातील काही मिनिटे अतिशय संथ खेळाचे प्रदर्शन झाले. मात्र साऊथ सुदानच्या फ्रॅंक व मामेर यांनी अफलातून चाल रचत दोन बाचावपटूना गुंगारा देत गोल मारण्याचा सुंदर प्रयत्न केला.

निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने हा सामना पेनल्टी शुट आऊटमध्ये गेला. पेनल्टी शुट आऊटमध्ये साऊथ सुदानने सुदानचा 4-3 असा पराभव केला. साऊथ सुदानकडून जोन मामेर, माईक, ईझान पॅट्रिक्‍स व डेव्हिड हे गोल करण्यात यशस्वी ठरले, तर सुदानकडून मोहम्मद, सलाह, अहमद यांना गोल करण्यात यश आले. तर, हसन व अली यांना गोल करण्यात अपयश आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)