मेस्सीच्या गोलने बार्सिलोनाचा सहज विजय

file photo.......

बार्सिलोना -स्टार आघाडीपटू लियोनेल मेस्सी आणि नेल्सन सेमेदी यांनी केलेल्या गोलाच्या जोरावर ला लिगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना संघाने गिरोना संघाचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेतील आघाडी कायम राखली.

पहिल्या सत्राची सुरुवात बार्सिलोना संघाने आक्रमक चाली रचत केली. त्यात त्यांना 9 व्या मिनिटाला यश आले. नेल्सन लेफ्ट बॅक जागेवर खेळणाऱ्या नेल्सन सेमिदीने गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. त्यानंतर 15 व्या मिनिटाला मेस्सीच्या पास वर कोटिन्होला गोल कारण्याची सुरेख संधी निर्माण झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु, कोटिन्हो गिरोनाच्या गोलरक्षकला चुकवू शकला नाही. त्यांनतर दोन्ही संघांनी आक्रमक चाली रचल्या पण पहिल्या सत्रात आणखी गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रातही बार्सिलोनाचे वर्चस्व राहिले. 68 व्या मिनिटाला गोल करत लियोनेल मेस्सीने बार्सिलोनाची आघाडी 2-0 केली. त्यानंतर गोरोना संघाची आक्रमणे वाढली मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले. या विजयाने बर्सिलोनाची अव्वल स्थानाची अघाडी 5 गुणांची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)