आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय

पुणे  -ब्रिक्‍स स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर (बीएसओए) आणि पद्मभूषण डॉ. वसंतदाद पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर या संघांनी शिअरफोर्स क्रीडा स्पधेर्तील फुटबॉलमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली.

वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यात फुटबॉलमध्ये सलामीच्या लढतीत बीएसओए संघाने अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर (एपीसीओए) संघावर 1-0ने मात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यात देवाज बाविस्करने 9 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. दुसऱ्या लढतीत पीव्हीपीसीओए संघाने अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर संघावर 1-0ने मात केली. यात 5 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत पार्थ मठकरीने संघाला विजय मिळवून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)