विजयासह बार्सेलोनाचे पहिले स्थान भक्कम

माद्रिद – लियोनेल मेस्सी आणि लुईस सुवारेज यांनी केलेल्या प्रत्त्येकी एका गोलच्या बळावर ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेत बार्सेलोना संघाने गताफे क्‍लबचा 2-1 असा पराभव केला.मेस्सीने 20 व्या मिनिटाला, सुवारेजने 39 व्या मिनिटाला गोल नोंदवले. तर गताफेसाठी जे. माटा याने 43 मिनिटाला गोल केला होता. या विजयामुळे त्यांचे 40 गुण झाले असून दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऍथलेटिको माद्रिद संघाचे 35 गुण आहेत.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच बार्सेलोना संघाने सामन्यावर वर्चस्व स्थापन केले होते. त्याने काही आक्रमक चाली रचल्या परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यास ते अपयशी ठरले. 20 व्या मिनिटाला गताफेच्या बचावपटूंच्या चुकीचा फायदा घेत मेस्सीने गोल केला. त्यानांतर बार्सेलोनाने आक्रमणे वाढवली आणि त्याचा फायदा त्यांना 39व्या मिनिटाला मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओस्माने डेम्बलेकडूना मिळालेल्या पासवर सुवारेजने आकर्षक गोल केला आणि बार्सेलोना सांघाचे आघाडी 2-0 वाढवली. परंतु, चार मिनिटांनी गताफेसाठी माटाने गोल करत पिछाडी 1-2 अशी भरून काढलेली. त्यानंतर पहिले सत्र संपले. दुस्रया सत्रात दोन्ही संघाने आक्रमक खेळ केला. परंतु गोल करण्यात दोनंही संघ अपयशी ठरल्याने शेवटी सामना 2-1 असा बार्सेलोनाने जिंकला.

अन्य सामन्यात घरच्या मैदानावर रियाल माद्रिद संघाला रियल सोसिएदाद संघाने 2-0 असे नमवले. त्यामुळे माद्रिद गुणतक्त्‌यात 5व्या स्थानी पोहचले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)