टोटेनहॅम हॉट्‌सपुर्सचा विजय

कार्डिफ – आघाडीपटूंच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर टोटेनहॅम हॉट्‌सपुर्स संघाने कार्डिफ सिटीचा 3-0 असा पराभव करत इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये आपले दुसरे स्थान मजबूत केले.

टोटेनहॅमसाठी हॅरी केन, क्रिस्टन एरिक्‍सन आणि सन यांनी गोल केले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच तिसऱ्या मिनिटाला हॅरी केनने गोल करत टोटेनहॅमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर देखील आक्रमक चाली रचत त्यांनी 12 व्या मिनिटाला गोल केला. हा गोल मधल्या फळीतील खेळाडू एरिक्‍सनने नोंदवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

26 व्या मिनिटाला सनने गोल करत आघाडी 3-0 केली. त्यानंतर पहिल्या सत्रात आणखी गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रातही टोटेनहॅम संघाने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. परंतु, गोलचा वेध घेण्यात ते कमी पडत होते.

71 व्या मिनिटला कार्डिफ संघाने गोल करण्याची संधी दवडली. त्यानंतर टोटेनहॅमने काही आक्रमक चाली रचल्या परंतु गोल करण्यात अपयश आल्याने दुसऱ्या सत्रात गोल होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना अखेर 3-0 असे टोटेनहॅमने आपल्या नावे केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)