पराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक

माद्रिद  – बार्सेलोना संघाचा ला लिगा मधील पुढील सामना लवान्टे संघाशी होणार आहे. मगील वर्षी लीगमधील 36 सामन्यात अपराजीत असणाऱ्या बर्सेलोनाचा विजयीरथ लवान्टेने रोखला होता. त्यामुळे लीगमधील 38 सामन्यात अपराजीत राहुन इतिहास घडवण्याची संधी बार्सेलोनाला साधता आली नव्हती.

त्या सामन्यात स्टार खेळाडु लियोनेल मेस्सीला विश्रांती देणे बर्सेलोनाला महागात पडले होते. परंतु, मागील सामन्यत जोर्डी अल्बा, लियोनेल मेस्सी, सुवारेज, मार्क टेर स्टेगन, जेराड पिके यांना आराम देवुन बर्सेलोनाने लेवान्टे विरुद्धच्या सामन्यासाठी ताजेतवाने ठेवले आहे. त्यामुळे बर्सेलोना या सामन्यात त्या पराभवाची परतफेड करण्यास सज्ज झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लवान्टे संघासाठी त्यांच्या अघाडीपटुंची गती हीच ताकद आहे. बार्सेलोनाच्या अनुभवी आणि वयाने वरिष्ठ असलेल्या बाचावपटुंपुढे लवान्टे संघ गतीशील खेळ करत पुन्हा अडथळे निर्माण करु शकतो. त्यामुळे गुणतक्‍त्यात पहिल्या स्थनावर असणारे बार्सेलोना सताव्या स्थनावर असणाऱ्या लवान्टे विरुद्ध विजय मिळविणार की पुन्हा मोठा उलटफेर पहायला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)